धरण माहिती

मौजे हनुमाननगर गावापासून १५ किमी अंतरावर गोदावरी हि मुख्य नदी असून नांदूरमधमेश्वर गावाचे परिसरात नदीवर पुरातन  धरण अस्तित्वात आहे तसेच धरणालगत पक्षी अभयारण्य असून त्यामुळे देशभरातून पर्यटक भेटीसाठी येत असतात ,नदीकाठचे वातावरण शांत आणि रमणीय असल्यामुळे निफाड तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळख निर्माण झालेली आहे .

सिमेंट बंधारे

मौजे हनुमाननगर गावामध्ये लोनजाई नदी असून सदर नदीवर ६ सिमेंट बंधारे बांधकामे करण्यात आलेली असून पालखेड डावा कालव्याचे पाणी बंधाऱ्यामध्ये सोडून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध केले जाते व परिणामी गावातील शेतकऱ्यांचे विहिरींना बाराही महिने पाणी उपलब्ध असते परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झालेले दिसते ...