💬
ग्राम-सहाय्यक
Online
कृपया पडताळणी पूर्ण करा

गावाविषयी माहिती

मौजे हनुमाननगर हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक छोटंस , १५३८ लोकसंख्या असलेलं आदर्श गाव आहे, हे गाव निफाड तालुक्याच्या मुख्यालयापासून सुमारे १५ किमी अंतरावर स्थित आहे आणि नाशिक जिल्हा मुख्यालयापासून  ५६ किमी अंतरावर आहे, मौजे हनुमाननगर हे गाव निफाड तालुक्यात पूर्व भागात विंचूर येवला रोड लगत वसलेले आहे.

हनुमाननगर गावामध्ये ८० % शेतकरी कुटुंब व २०% कुटुंब मजूर वर्ग आहेत हनुमाननगर गावात सत्यमाता देवी मंदिर व हनुमान मंदिर तसेच खंडेराव मंदिर हि जागृत धार्मिक स्थळे आहेत गावालगत लोनजाई नदी असून गावाचे शिवारातून पालखेड डावा कालवा गेलेला आहेत, तसेच हनुमाननगर गावाचे शिवारातून नाशिक विंचूर येवला छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्ग गेलेला आहेत तसेच हनुमाननगर गावासाठी विंचूर व लासलगाव ह्या जवळच्या बाजार पेठा उपलब्ध आहेत,शेतकरी वर्गाचा शेतमाल विक्रीसाठी विंचूर व लासलगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समित्या उपलब्ध आहे.

तसेच नागरिकांना प्रवासाचे दृष्टीने लासलगाव रेल्वे स्टेशन तसेच विंचूर बस स्थानक उपलब्ध आहेत, हनुमाननगर गावात शेतकरी वर्गाचे द्राक्ष फळबाग हे मुख्य पीक असून कांदा ,मका, टोमॅटो, गहू ,सोयाबीन तसेच भाजीपाला वर्गीय हंगामी पिके घेतली जातात, गावाशिवारात पालखेड डाव्या कालव्याची उप चारी क्र २ चे पाट चारीने शिवारामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होते तसेच गावामध्ये दोन अंगणवाडी केंद्र असून इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत तसेच सुसज्ज बंदिस्त व खुली  व्यायामशाळा उपलब्ध आहेत.

,तसेच सुसज्ज सर्व सुविधायुक्त स्मशानभूमी तसेच दशक्रिया विधी शेड उपलब्ध आहेत , गावात नागरिकांना ग्रामपंचायतीचे वतीने शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी जल शुद्धीकरण यंत्र कार्यान्वित करण्यात आलेले आहेत, गावात एकून ३०० कुटुंब असून गावठाण हद्दीत ९१ कुटुंब वास्तव्य करतात तसेच २०९ कुटुंब शेत शिवारामध्ये राहतात.

गावातील १००% कुटुंबाना पिण्याचे व वापराचे पाणी पुरवठासाठी नळ जोडणी करण्यात आलेली आहेत, तसेच गावठाण हद्दी मध्ये गावांतर्गत १००% रस्ता कॉन्क्रेटीकरण व भूमिगत गटार करण्यात आलेल्या आहेत ,तसेच शेत शिवारातील सर्व शेत रस्ते मुरमीकरण करण्यात आलेले आहे,

गावातील  नारिकांना कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने वैयक्तिक तसेच सार्वजानिक ओला व सुका कचरा कुंडीची व्यवस्था करण्यात आलेली आहेत ,तसेच नॅडेप कंपोस्ट खत खड्डा व गांडूळ खत खड्डा व्यवस्था तसेच कचरा संकलन केंद्र व कचरा वाहतूक गाडीची व्यवस्था नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ,तसेच नागरिकांसाठी नाना नाणी पार्क तसेच औषधी वनस्पती उद्यान ऑक्सिजन पार्क व पक्षी पार्क सुरु करण्यात आलेला आहे तसेच गावातील सर्व शासकीय विभागांच्या वतीने सर्व सेवा वेळेत नागरिकांना दिल्या जातात.  

सामान्य माहिती
भौगोलिक माहिती पिन कोड: ४२२३०५ पोस्टल हेड ऑफिस: विंचूर , जवळची गावे:- विंचूर,विष्णूनगर,डोंगरगाव,नांदगाव,वाहेगाव,भरवस ,मरळगोई बू , पाचोरे, लासलगाव, कोटमगाव सुभाषनगर असून जवळचे तालुके: चांदवड, येवला, कोपरगाव, सिन्नर हे आहेत.

तपशील माहिती
एकूण लोकसंख्या (२०११ नुसार) १५३८
पुरुष ७९३
स्त्रिया ७४५
लिंगगुणोत्तर ९४० स्त्रिया प्रति १००० पुरुष
बालकांची संख्या (०-६ वय) १७५ (११.३८%)
घरांची संख्या ३००
साक्षरता दर ८६.१%

भौगोलिक स्थान

मौजे हनुमाननगर हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक छोटंस , १५३८ लोकसंख्या असलेलं आदर्श गाव आहे, हे गाव निफाड तालुक्याच्या मुख्यालयापासून सुमारे १५ किमी अंतरावर स्थित आहे आणि नाशिक जिल्हा मुख्यालयापासून  ५६ किमी अंतरावर आहे,

मौजे हनुमाननगर हे गाव निफाड तालुक्यात पूर्व भागात विंचूर येवला रोड लगत वसलेले आहे ,हनुमाननगर गावामध्ये ८० % शेतकरी कुटुंब व २०% कुटुंब मजूर वर्ग आहेत हनुमाननगर गावात सत्यमाता देवी मंदिर व हनुमान मंदिर तसेच खंडेराव मंदिर हि जागृत धार्मिक स्थळे आहेत गावालगत लोनजाई नदी असून गावाचे शिवारातून पालखेड डावा कालवा गेलेला आहेत, तसेच हनुमाननगर गावाचे शिवारातून नाशिक विंचूर येवला छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्ग गेलेला आहेत तसेच हनुमाननगर गावासाठी विंचूर व लासलगाव ह्या जवळच्या बाजार पेठा उपलब्ध आहेत,

शेतकरी वर्गाचा शेतमाल विक्रीसाठी विंचूर व लासलगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समित्या उपलब्ध आहे तसेच नागरिकांना प्रवासाचे दृष्टीने लासलगाव रेल्वे स्टेशन तसेच विंचूर बस स्थानक उपलब्ध आहेत, हनुमाननगर गावात शेतकरी वर्गाचे द्राक्ष फळबाग हे मुख्य पीक असून कांदा ,मका, टोमॅटो, गहू ,सोयाबीन तसेच भाजीपाला वर्गीय हंगामी पिके घेतली जातात,

गावाशिवारात पालखेड डाव्या कालव्याची उप चारी क्र २ चे पाट चारीने शिवारामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होते तसेच गावामध्ये दोन अंगणवाडी केंद्र असून इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत तसेच सुसज्ज बंदिस्त व खुली  व्यायामशाळा उपलब्ध आहेत ,तसेच सुसज्ज सर्व सुविधायुक्त स्मशानभूमी तसेच दशक्रिया विधी शेड उपलब्ध आहेत ,

 गावात नागरिकांना ग्रामपंचायतीचे वतीने शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी जल शुद्धीकरण यंत्र कार्यान्वित करण्यात आलेले आहेत, गावात एकून ३०० कुटुंब असून गावठाण हद्दीत ९१ कुटुंब वास्तव्य करतात तसेच २०९ कुटुंब शेत शिवारामध्ये राहतात ,गावातील १००% कुटुंबाना पिण्याचे व वापराचे पाणी पुरवठासाठी नळ जोडणी करण्यात आलेली आहेत, तसेच गावठाण हद्दी मध्ये गावांतर्गत १००% रस्ता कॉन्क्रेटीकरण व भूमिगत गटार करण्यात आलेल्या आहेत ,

तसेच शेत शिवारातील सर्व शेत रस्ते मुरमीकरण करण्यात आलेले आहे ,गावातील  नारिकांना कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने वैयक्तिक तसेच सार्वजानिक ओला व सुका कचरा कुंडीची व्यवस्था करण्यात आलेली आहेत ,तसेच नॅडेप कंपोस्ट खत खड्डा व गांडूळ खत खड्डा व्यवस्था तसेच कचरा संकलन केंद्र व कचरा वाहतूक गाडीची व्यवस्था नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ,तसेच नागरिकांसाठी नाना नाणी पार्क तसेच औषधी वनस्पती उद्यान ऑक्सिजन पार्क व पक्षी पार्क सुरु करण्यात आलेला आहे तसेच गावातील सर्व शासकीय विभागांच्या वतीने सर्व सेवा वेळेत नागरिकांना दिल्या जातात.  

भौगोलिक स्थान
राज्य : महाराष्ट्र

जिल्हा : नाशिक

तालुका : निफाड

पिनकोड : ४२२३०५

स्थानिक वैशिष्ट्ये
हनुमाननगर हे गाव गोदावरी नदी खोऱ्याजवळील सपाट व सुपीक भूभागावर आहे.

परिसरात काळी व गाळयुक्त जमीन मोठ्या प्रमाणात आढळते, त्यामुळे शेतीस पोषक वातावरण आहे.

गावामध्ये  द्राक्ष, कांदा, ऊस आणि भाजीपाला यांची मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते.

हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे असून पावसाळ्यात मध्यम पाऊस पडतो.

दळणवळण
निफाड तालुका मुख्यालया पासून अंदाजे १५ किमी अंतरावर आहे.

विंचूर व लासलगाव हे जवळचे प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण आहे.

रस्तेमार्गाने गावाचा नाशिक, येवला ,सिन्नर ,चांदवड  या भागांशी संपर्क आहे.

नैसर्गिक वातावरण
गावाभोवती हिरवीगार शेती, द्राक्षबागा आणि ग्रामीण वातावरण आढळते. त्यामुळे हनुमाननगर हे शांत, स्वच्छ आणि कृषीप्रधान गाव म्हणून ओळखले जाते.

लोकजीवन

हनुमाननगर गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून द्राक्ष, , कांदा, मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व लघुउद्योग यामध्येही कार्यरत आहेत.तसेच विंचूर व लासलगाव कांदा मार्केट मध्ये तसेच विंचूर  औद्योगिक वसाहतीमध्ये गावातील  मजूर वर्गास मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो त्यामुळे त्यामुळे गावात बेरोजगारांचे प्रमाण आढळून येत नाही .. 

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा सप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

हनुमाननगर लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

तपशील संख्या
पुरुष ७९३
स्त्री ७४५
एकूण १५३८

संस्कृती व परंपरा

हनुमाननगर गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व सप्ताह, तसेच खंडेराव महाराज ,सत्यमाता तसेच ज्योतिबा महाराज यात्रा  यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे हनुमाननगर गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

हनुमाननगर परिसरात धार्मिक, नैसर्गिक आणि ग्रामीण सौंदर्याने नटलेली अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. गाव आणि आसपासच्या भागात भेट देण्यासाठी पुढील ठिकाणे प्रसिद्ध आहेत.

१. हनुमान मंदिर
गावातील प्राचीन हनुमान मंदिर हे श्रद्धास्थान मानले जाते. हनुमान जयंतीच्या वेळी येथे मोठी यात्रा आणि धार्मिक कार्यक्रम होतात. मंदिर परिसर शांत आणि प्रसन्न वातावरणासाठी ओळखला जातो.

२. द्राक्षबागा
निफाड तालुका द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असल्यामुळे हनुमाननगर परिसरात सुंदर द्राक्षबागा पाहायला मिळतात. हिरवीगार बागा आणि शेती पर्यटनासाठी हा भाग आकर्षक आहे.

३. लासलगाव कांदा बाजार
लासलगाव येथील कांदा बाजार आशियातील सर्वात मोठ्या कांदा बाजारांपैकी एक मानला जातो. येथे ग्रामीण व्यापार आणि कृषी अर्थव्यवस्थेचे दर्शन घडते.

४. गोदावरी नदी परिसर
मौजे हनुमाननगर गावापासून १५ किमी अंतरावर गोदावरी हि मुख्य नदी असून नांदूरमधमेश्वर गावाचे परिसरात नदीवर पुरातन  धरण अस्तित्वात आहे तसेच धरणालगत पक्षी अभयारण्य असून त्यामुळे देशभरातून पर्यटक भेटीसाठी येत असतात ,नदीकाठचे वातावरण शांत आणि रमणीय असल्यामुळे निफाड तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळख निर्माण झालेली आहे .

५. निफाड परिसरातील धार्मिक स्थळे
निफाड परिसरात सुभाषनगर येथे लोनजाई माता मंदिर तसेच नैताळे येथे मतोबा महाराज मंदिर, खेडले झुंगे येथे हनुमान मंदिर ,खेडे येथे हिंगलाज माता मंदिर कोठुर येथील महादेव मंदिर तसेच ओझर येथील खंडेराव महाराज मंदिर तसेच विष्णूनगर येथील म्हसोबा महाराज मंद्दीर हि जागृत धार्मिक स्थळे आहेत. येथे वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम आणि हरिनाम सप्ताह आयोजित केले जातात.या धार्मिक स्थळांमुळे तालुक्याची ओळख निर्माण झालेली आहे,  

६. ग्रामीण जीवन अनुभव
हनुमाननगरचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील ग्रामीण संस्कृती , आधुनिक शेती तसेच शेतीपूरक व्यवसायामुळे गावाची नवीन ओळख निर्माण झाली आहे तसेच गावातील तरुण पिढीमध्ये अभ्यासू व खेळाडू वृत्ती असून गावातील तरुण पिढीमधील काही विद्यार्थी पोलीस दलामध्ये भारतीय सैन्य दलामध्ये तसेच न्यायालयमध्ये वकील तसेच महसूल व ग्रामविकास विभागाचे कार्यालयामध्ये सेवेत कार्यरत आहेत तसेच वैयक्तिक शेतकरी वर्गाचे दुग्ध व्यवसाय , बेदाणा व्यवसाय , बचत गटाच्या माध्यमातून तसेच प्रभाग संघाचे माध्यमातून गावातील महिला शेतकरी व पुरुष शेतकरी यांनी गट स्थापन करून गटाचे माध्यमातून व्यवस्य सुरु केलेलं आहेत त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहेत .  

निष्कर्ष
हनुमाननगर आणि आसपासचा परिसर धार्मिक श्रद्धा, शेती संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा सुंदर संगम आहे. ग्रामीण पर्यटन आणि शांत वातावरण अनुभवण्यासाठी हे ठिकाण उपयुक्त मानले जाते.

जवळची गावे

हनुमाननगर या गावाजवळील प्रमुख गावे पुढीलप्रमाणे आहेत:

मरळगोई, पाचोरे, लासलगाव, विंचूर, विष्णूनगर, वाहेगाव, भरवस, डोंगरगाव, सुभाषनगर, गोळेगाव, गोंदेगाव.

ही गावे शेती, बाजारपेठ आणि सामाजिक व्यवहारांसाठी हनुमाननगरशी जोडलेली आहेत. विशेषतः लासलगाव हे आशियातील प्रसिद्ध कांदा बाजारपेठ म्हणून ओळखले जाते.