गावाविषयी माहिती
मौजे हनुमाननगर हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक छोटंस , १५३८ लोकसंख्या असलेलं आदर्श गाव आहे, हे गाव निफाड तालुक्याच्या मुख्यालयापासून सुमारे १५ किमी अंतरावर स्थित आहे आणि नाशिक जिल्हा मुख्यालयापासून ५६ किमी अंतरावर आहे, मौजे हनुमाननगर हे गाव निफाड तालुक्यात पूर्व भागात विंचूर येवला रोड लगत वसलेले आहे.
हनुमाननगर गावामध्ये ८० % शेतकरी कुटुंब व २०% कुटुंब मजूर वर्ग आहेत हनुमाननगर गावात सत्यमाता देवी मंदिर व हनुमान मंदिर तसेच खंडेराव मंदिर हि जागृत धार्मिक स्थळे आहेत गावालगत लोनजाई नदी असून गावाचे शिवारातून पालखेड डावा कालवा गेलेला आहेत, तसेच हनुमाननगर गावाचे शिवारातून नाशिक विंचूर येवला छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्ग गेलेला आहेत तसेच हनुमाननगर गावासाठी विंचूर व लासलगाव ह्या जवळच्या बाजार पेठा उपलब्ध आहेत,शेतकरी वर्गाचा शेतमाल विक्रीसाठी विंचूर व लासलगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समित्या उपलब्ध आहे.
तसेच नागरिकांना प्रवासाचे दृष्टीने लासलगाव रेल्वे स्टेशन तसेच विंचूर बस स्थानक उपलब्ध आहेत, हनुमाननगर गावात शेतकरी वर्गाचे द्राक्ष फळबाग हे मुख्य पीक असून कांदा ,मका, टोमॅटो, गहू ,सोयाबीन तसेच भाजीपाला वर्गीय हंगामी पिके घेतली जातात, गावाशिवारात पालखेड डाव्या कालव्याची उप चारी क्र २ चे पाट चारीने शिवारामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होते तसेच गावामध्ये दोन अंगणवाडी केंद्र असून इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत तसेच सुसज्ज बंदिस्त व खुली व्यायामशाळा उपलब्ध आहेत.
,तसेच सुसज्ज सर्व सुविधायुक्त स्मशानभूमी तसेच दशक्रिया विधी शेड उपलब्ध आहेत , गावात नागरिकांना ग्रामपंचायतीचे वतीने शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी जल शुद्धीकरण यंत्र कार्यान्वित करण्यात आलेले आहेत, गावात एकून ३०० कुटुंब असून गावठाण हद्दीत ९१ कुटुंब वास्तव्य करतात तसेच २०९ कुटुंब शेत शिवारामध्ये राहतात.
गावातील १००% कुटुंबाना पिण्याचे व वापराचे पाणी पुरवठासाठी नळ जोडणी करण्यात आलेली आहेत, तसेच गावठाण हद्दी मध्ये गावांतर्गत १००% रस्ता कॉन्क्रेटीकरण व भूमिगत गटार करण्यात आलेल्या आहेत ,तसेच शेत शिवारातील सर्व शेत रस्ते मुरमीकरण करण्यात आलेले आहे,
गावातील नारिकांना कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने वैयक्तिक तसेच सार्वजानिक ओला व सुका कचरा कुंडीची व्यवस्था करण्यात आलेली आहेत ,तसेच नॅडेप कंपोस्ट खत खड्डा व गांडूळ खत खड्डा व्यवस्था तसेच कचरा संकलन केंद्र व कचरा वाहतूक गाडीची व्यवस्था नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ,तसेच नागरिकांसाठी नाना नाणी पार्क तसेच औषधी वनस्पती उद्यान ऑक्सिजन पार्क व पक्षी पार्क सुरु करण्यात आलेला आहे तसेच गावातील सर्व शासकीय विभागांच्या वतीने सर्व सेवा वेळेत नागरिकांना दिल्या जातात.
सामान्य माहिती
भौगोलिक माहिती पिन कोड: ४२२३०५ पोस्टल हेड ऑफिस: विंचूर , जवळची गावे:- विंचूर,विष्णूनगर,डोंगरगाव,नांदगाव,वाहेगाव,भरवस ,मरळगोई बू , पाचोरे, लासलगाव, कोटमगाव सुभाषनगर असून जवळचे तालुके: चांदवड, येवला, कोपरगाव, सिन्नर हे आहेत.
तपशील माहिती एकूण लोकसंख्या (२०११ नुसार) १५३८ पुरुष ७९३ स्त्रिया ७४५ लिंगगुणोत्तर ९४० स्त्रिया प्रति १००० पुरुष बालकांची संख्या (०-६ वय) १७५ (११.३८%) घरांची संख्या ३०० साक्षरता दर ८६.१%