महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता, २०११ मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीच्या आर्थिक, प्रशासकीय व विकासात्मक कामकाजाची योग्य नोंद ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या नोंदवह्या व अभिलेखे ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार नमुना क्र. १ ते ३३ पर्यंतच्या नोंदवह्यांमध्ये ग्रामपंचायतीचे अर्थसंकल्प, जमा-खर्च, कर आकारणी, मालमत्ता नोंदी, विकासकामे, कर्मचारी माहिती, लेखापरीक्षण, कर्ज व्यवहार, गुंतवणूक, स्थावर मालमत्ता तसेच इतर प्रशासकीय बाबींची माहिती नोंदविली जाते.
प्रत्येक वित्तीय वर्षासाठी स्वतंत्र लेखे ठेवले जातात व सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद संबंधित नमुन्यांमध्ये करण्यात येते. ग्रामपंचायतीच्या निधीचा वापर करताना वित्तीय औचित्याची तत्त्वे व शासनाने निर्धारित केलेले नियम यांचे पालन करणे आवश्यक असते. यामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व व आर्थिक शिस्त राखली जाते.
सर्व नोंदवह्या व अभिलेखे सुस्थितीत ठेवण्यात येतात तसेच आवश्यकतेनुसार त्यांचे अद्ययावतीकरण करण्यात येते. या नोंदींच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती नागरिक, शासन संस्था व लेखापरीक्षण यंत्रणेस उपलब्ध होते.
खालील नमुना क्रमांक १ ते ३३ मधील सविस्तर माहिती पाहण्यासाठी संबंधित नमुन्यावर क्लिक करा.